Ad will apear here
Next
बॅडमिंटनमधील उगवता ‘तारा’
तारा शहाबॅडमिंटन या खेळात दिवसेंदिवस अनेक खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करताना दिसत आहेत. साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज शेकडो मुली या खेळाकडे वळत आहेत. केवळ वळत आहेत असे नव्हे, तर राज्याचे, देशाचे प्रतिनिधित्व करता यावे, यासाठी धडपडत आहेत. पुण्याची तारा शहा ही अशीच एक गुणी खेळाडू... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बॅडमिंटनपटू तारा शहाबद्दल...
...................
पाटणा, बिहार येथे झालेल्या अखिल भारतीय सबज्युनिअर गटाच्या बॅडमिंटन स्पर्धेत बारा वर्षांच्या तारा शहाने पंधरा वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवले आणि आपण मानांकित खेळाडूंबरोबरही आत्मविश्वासाने खेळी करू शकतो, असा विश्वास उपस्थितांना दिला. या स्पर्धेत ताराला दुसरे मानांकन होते. अंतिम सामन्यात तिने उत्तर प्रदेशची चौथी मानांकित तनिशा सिंग हिच्यावर २१-१९, २१-८ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. ताराने ऑगस्टमध्ये झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेतील अंतिम सामन्यातही आपलेच वर्चस्व सिद्ध करून विजेतेपद मिळवले. जुलै महिन्यात नागपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत तनिशा सिंगने ताराला पराभूत केले होते. यंदा मात्र ताराने त्या पराभवाचा वचपा काढला.

वयाच्या सहाव्या वर्षी बॅडमिंटनची रॅकेट हातात घेऊन ताराने सरावाला सुरुवात केली. सध्या ती निखिल कानिटकर बॅडमिंटन अकादमीत सराव करते. दर वर्षी ती साधारण आठ ते दहा स्पर्धां खेळते. या सर्व स्पर्धा मोठ्या स्तरावरील असतात. सध्याच्या घडीला तारा राष्ट्रीय मानांकन यादीत पहिल्या पाच खेळाडूंत गणली जाते. यामागे केवळ तिची मेहनतच कारणीभूत नसून तिला मिळत असलेले निखिल कानिटकर यांचे योग्य मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरत आहे. आता तिला खेळाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीवरही भर द्यावा लागणार आहे. 

सध्या तारा केवळ बारा वर्षांची असून पुढील काळात तिला खुल्या गटात आणखी मातब्बर खेळाडूंविरुद्ध खेळावे लागणार आहे. कारण या स्तरावर केवळ खेळ किंवा त्यातली गुणवत्ताच महत्त्वाची नसून मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीदेखील महत्त्वाची ठरते. शिवाय तिला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे ड्रॉप आउट होण्याची अजिबात शक्यता नाही. ती विद्या व्हॅली स्कूलमध्ये शिकत असून, खेळाबरोबरच शिक्षणातही अग्रेसर आहे.  

तेरा वर्षांखालील गटात आज ती महाराष्ट्र चॅम्पियन आहे. त्याचबरोबर १६४७ रेटिंग गुण तिच्या खात्यावर जमा असून, ती राज्यात पहिल्या स्थानावर आहे. २०१८ हे वर्ष तिच्यासाठी स्वप्नवत ठरत आहे. जयपूर आणि आंध्र प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय स्पर्धांमध्ये तिने विजेतेपद मिळवले व बॅडमिंटनमधील जाणकारांना आपली दखल घ्यायला लावली.  कोईमतूर आणि गोवा येथे झालेल्या स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले; मात्र तिने या मानसिकतेतून बाहेर पडून पाटणा येथे झालेली स्पर्धा जिंकून ती उणीव भरून काढली. तिचे प्रशिक्षक निखिल कानिटकर स्वतः ताराच्या खेळाबाबत बोलताना तिचे खूप कौतुक करतात. तिची हीच कामगिरी पंधरा वर्षांखालील गटानंतर खुल्या गटातही कायम राहिली, तर साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांची वारसदार म्हणून ती नावारूपाला येऊ शकते इतकी अफाट गुणवत्ता तिच्यात आहे.  

वयाच्या सहाव्या वर्षी रॅकेट हातात धरून बॅडमिंटनमध्ये उतरलेली तारा केवळ सहा वर्षांतच दोन आंतरराष्ट्रीय पदकांची मानकरी ठरली. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, अशी कामगिरी खूप कमी खेळाडूंना जमली आहे. साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू याच तिच्या आदर्श असून या दोघींप्रमाणेच आपणही देशाचे प्रतिनिधित्व करावे व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रात यश मिळवावे हेच ध्येय तिने ठेवले आहे. 

अकादमीतील रोजचा सराव, तंदुरुस्तीसाठी आवश्यक असणारा व्यायाम आणि प्रशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन, यामुळे तारा एक परिपूर्ण खेळाडू म्हणून भरारी घेत आहे. ताराने आतापर्यंत पुणे आणि राज्य स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे. खुल्या गटात जेव्हा ती आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटवेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय तोडीची बॅडमिंटनपटू मिळेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVRBU
Similar Posts
बॅडमिंटनमधील आविष्कार! पुण्याच्या क्रीडा क्षेत्रात गेल्या आठ-दहा वर्षांपासून शहरी खेळाडूंबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूही आपली गुणवत्ता सिद्ध करताना दिसत आहेत. आपापल्या खेळाचा ध्यास घेतलेले हे खेळाडू मेहनतीने यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आविष्कार मोरे हा असाच एक बॅडमिंटनपटू सध्या आपले पाय रोवू पाहत आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात
बॅडमिंटनमधील नवी फुलराणी साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंकडून प्रेरणा घेऊन देशभरात असंख्य मुली ‘बॅडमिंटनमध्ये आपणही चांगली कामगिरी करायची,’ या ध्येयाने प्रेरित झाल्या. पुण्याची पूर्वा बर्वे अशीच एक प्रतिभावान खेळाडू. तिने आता जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीचा झेंडा फडकवला आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बॅडमिंटनपटू पूर्वा बर्वेबद्दल
बॅडमिंटनमध्ये आर्यची भरारी पुण्याच्या बॅडमिंटन क्षेत्रात केवळ स्थानिक पातळीवरील नव्हे, तर देशपातळीवरील खेळाडू तयार होतात हे येथील खेळाडूंनी सिद्ध करून दाखवले आहे. असे नवनवीन खेळाडू आपल्या खेळाने देशाचे नाव मोठे करतात. आर्य भिवपाठकी हा असाच पुण्यात नावारूपाला आलेला खेळाडू आता राज्याचेच नव्हे तर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे
टेनिसमधली नवी आशा : सालसा सचिनमुळे लहान मुले क्रिकेट खेळू लागली, साईना नेहवालमुळे मुली बॅडमिंटनमध्ये हातपाय मारायला लागल्या, त्याच धर्तीवर सानिया मिर्झाकडे बघत सालसासारख्या असंख्य मुली टेनिसकडे वळत आहेत आणि याच मुलींमधून देशाला सानिया मिर्झाची वारसदार सापडेल. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख टेनिसपटू सालसा आहेरबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language